Home Uncategorized अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये पालक सभा उत्साहात संपन्न..

अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये पालक सभा उत्साहात संपन्न..

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कुलमध्ये शनिवार (ता-२६) रोजी पालक सभा उत्साहात संपन्न झाली. अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या पालक सभेला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

पालक सभे दरम्यान स्कुलमार्फत घेण्यात आलेल्या सायकल परीक्षेचा निकाल डिजिटल स्मार्ट बोर्ड व प्रोजेक्टरद्वारे पालकांना दाखविण्यात आला. वैयक्तिक पालक-शिक्षक संवाद आयोजित केल्यामुळे विद्यार्थांच्या प्रगतीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेले विविध उपक्रम नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात आले. पालकांनी आपल्या पाल्याच्या होत असलेल्या सर्वांगीण विकासाबद्दल समाधान व्यक्त केले आणि अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल व धोरणांबद्दल समाधानी असल्याचे मत व्यक्त केले.

मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी स्वागत व समन्वयक श्रीमती विमल वांद्रे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment