Home Uncategorized कडगावमध्ये गांजाची लागवड : १७ किलो वजनाचा गांजा केला जप्त

कडगावमध्ये गांजाची लागवड : १७ किलो वजनाचा गांजा केला जप्त

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कडगाव(ता-गडहिंग्लज) येथे आज(गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत छापा मारून तब्बल १७ किलो २०० ग्राम वजनाचा २,१७,३८० रुपये किंमतीचा गांजासह मुद्देमाल जप्त केला. तर कडगाव येथील दोन युवकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनिल पाटील (वय-२५,रा-कडगाव),विकास उर्फ वैभव कांबळे (वय-२३,रा-कडगाव) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की संशयित सुनिल व विकास या दोघांनी घराच्या आडोशाला गांजाची लागवड केलेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कडगावमध्ये आज(गुरुवार) दुपारी २:३५ च्या सुमारास छापा मारून १७ किलो २०० ग्राम वजनांच्या गांजाच्या फांद्या व फुले जप्त केली. तर सुनिल व विकास या दोघांना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करित आहेत.

Related Posts

Leave a Comment