Home Uncategorized गडहिंग्लजमध्ये शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन् गणराया ॲवॉर्ड वितरण समारंभ : ना.हसन मुश्रीफ फौंडेशनचे आयोजन

गडहिंग्लजमध्ये शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन् गणराया ॲवॉर्ड वितरण समारंभ : ना.हसन मुश्रीफ फौंडेशनचे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ना. हसन मुश्रीफ फौंडेशन व कागल विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस मार्फत गडहिंग्लजमध्ये शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन् गणराया ॲवॉर्ड वितरण समारंभ सोहळा होणार आहे.

उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती, उत्कृष्ट तांत्रिक सजीव देखावा,उत्कृष्ट पर्यावरण पूरक देखावा,उत्कृष्ट सामाजिक कार्य असे चार विभागात श्री.गणराया ॲवॉर्ड प्रथम क्रमांक(११०००/-), द्वितीय क्रमांक (७०००/-) तृतीय क्रमांक (५०००/-) व उत्तेजनार्थ(३०००/-) रोख रक्कम व सन्मान चिन्ह अनुक्रमे देण्यात येणार आहेत.

सदरचा कार्यक्रम शनिवार (ता -२) रोजी सायं. ४.०० वाजता महादेव मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक गडहिंग्लज येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून विजेत्यांची नावे शनिवारी जाहीर केली जाणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Comment