गडहिंग्लज प्रतिनिधी : जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र गडहिंग्लज मार्फत दरवर्षीप्रमाणे गुरु पौर्णिमा सोहळा तथा कृतज्ञता दिन आज(शनिवार)मंत्री हॉल गडहिंग्लज येथे उत्साहात साजरा झाला. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान संदेश देणारे सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या कृतज्ञतेसाठी आजचा हा गुरुपौर्णिमा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हरिपाठ,नामसंकीर्तन,मानसपूजा यातून सर्व नामधारकांनी सद्गुरूंची उपासना केली.
तसेच जीवन विद्येचे संदेश देणारी नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमात रेश्मा कांबळे (कराड) यांनी ‘सद्गुरु सारखा असता पाठीराखा’ या विषयावर प्रबोधन केले. कार्यक्रमासाठी गडहिंग्लज विभागातील उपकेंद्रातील नामधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्राचा मार्फत दर मंगळवारी राधाकृष्ण मंदिर,आजरा रोड येथे संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत व मारुती मंदिर येथे शनिवारी पाच ते सहा या वेळेत सत्संग आयोजित केला जातो. हरिपाठ व सत्संगासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गडहिंग्लज ज्ञानसाधना केंद्राचे अध्यक्ष बंडोपंत देवाण यांनी केले आहे.