Home Uncategorized डिजिटल मिडिया आजरा तालुकाध्यक्ष ‘संभाजी जाधव’ यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रदान

डिजिटल मिडिया आजरा तालुकाध्यक्ष ‘संभाजी जाधव’ यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रदान

by Nitin More

कोल्हापूर प्रतिनिधी : दैनिक जनमतचे विभागीय प्रतिनिधी, डिजिटल मिडिया आजरा तालुका अध्यक्ष आणि सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र पोर्टल व युट्युब चॅनलचे मुख्य संपादक निर्भीड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे संभाजी जाधव यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संभाजी जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,राजकीय आणि ग्रामीण घडामोडींवर अभ्यासपूर्ण शैलीतून पत्रकारिता केली आहे. त्यांच्या निर्भीड लेखनशैलीने अनेक ठिकाणी अन्यायाविरोधात आवाज उठवून सामान्य जनतेसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर केला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला.

यावेळी पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे, असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले. संभाजी जाधव यांचे आजरा तालुक्यासह गडहिंग्लज विभागात कौतुक होत असून प्रिंट मीडियासह डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रेरणादायी ठरत आहे.

Related Posts

Leave a Comment