कोल्हापूर प्रतिनिधी : दैनिक पुण्यनगरीचे विभागीय प्रतिनिधी ‘प्रदिप पाटील’ यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदिप पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,राजकीय आणि ग्रामीण घडामोडींवर अभ्यासपूर्ण शैलीतून पत्रकारिता केली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने हा पुरस्कार जाहीर केला.
यावेळी पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे, असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले. पत्रकार प्रदीप पाटील यांचे गडहिंग्लज तालुक्यासह गडहिंग्लज विभागात कौतुक होत असून पत्रकारांसाठी ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रेरणादायी ठरत आहे.