गडहिंग्लज प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय व विविध पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री प्राजक्ता माळी रविवारी (ता-२) रोजी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित ‘एक्सप्लोर 2025’ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आजवर समूहाने विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच कौशल्य,प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवले आहेत. यावर्षी एक्सप्लोर 2025 या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या कौशल्याची चाचपणी करून मिस व मिस्टर ‘एसजीएम’ चा विजेता ठरणार आहे. विजेत्याना ‘ई-बाईक’ देऊन गौरवण्यात येणार आहे. याची अंतिम फेरी अभिनेत्री माळी यांच्या निरीक्षणात विजेता घोषित करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांशी मनोगत व हितगुज करणार आहेत.
सदरचा कार्यक्रम फक्त शिक्षण समूहातील विद्यार्थी व निमंत्रितासाठी असून यासाठी भव्य व आकर्षक सेटची उभारणी करण्यात आली आहे. त्यानंतर ‘डीजे नाईट’ कार्यक्रम होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष व उत्साह पाहावयास मिळणार आहे.