गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर लाईव्ह आणि राजा गडहिंग्लजचा हाळलक्ष्मी गणेश मंडळ, गडहिंग्लज यांच्या सयुक्त विद्यमाने गडहिंग्लजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त व कोल्हापूर लाईव्हचे संपादक अभिजीत मांगले यांच्या वाढदिवसानिमित्त आज(गुरुवार) सायंकाळी ठीक सहा वाजता ‘होममिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-पैठणी व सोन्याची नथ
द्वितीय क्रमांक-पैठणी व मिक्सर तृतिय क्रमांक -पैठणी व कुकर
तर उतेजनार्थ (२) क्रमांक आकर्षक भेट वस्तु देण्यात येणार असून
भागातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. माऊली भाऊजी कार्यक्रम करणार असून श्री हाळलक्ष्मी मंदिर, वडरगे रोड, गडहिंग्लज येथे संपन्न होणार आहे. सदरच्या कार्यक्रमात महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकामार्फत करण्यात आले आहे.