गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज मोबाईल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवाजी पाटील तर उपाध्यक्षपदी समीर बिरंजे यांची एकमताने निवड करण्यात आली असून माजी अध्यक्ष महेश येरनाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरच्या निवडी करण्यात आल्या. तसेच यावेळी खजिनदारपदी किरण शिंत्रे,सचिवपदी रमेश जाधव यांची देखील निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गडहिंग्लजमध्ये गडहिंग्लज मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक असोसिएशनच्या सदस्यांच्या समस्या जाणून घेऊन ‘त्या’ सोडविण्याचा व सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा मानस यावेळी नूतन अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी बोलून दाखवला. यावेळी अमीर खलिफा,महेश शहा,अमर सुतार,किरण शिंत्रे,मंगेश कोळी यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.