गडहिंग्लज प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाज गडहिंग्लज यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तर होऊ घातलेल्या कागल आणि चंदगड विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या समाजाचे उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आपल्या समाजाचा सर्व राजकीय पक्षांनी वापर करून घेतला आहे. परंतु समाजाचे काही कल्याण केले नाही. म्हणून आपल्या समाजातील सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून देणे बाबत चर्चा करण्यात आली.
लोकप्रतिनिधींनी कधीच मराठा समाजासाठी,मंगल कार्यालय,गोरगरीब मराठा समाजातील मुला,मुलींचेसाठी वसतिगृह ,अभ्यासिका,रोजगार,व्यवसाय,आणण्यासाठी प्रयत्न केला नाही, राज्यकर्त्यांनी आमच्या समाजासाठी काहीच केले नाही ही खेदजनक बाब असून आमचं ठरलंय आपला समाज.. आमची माती…आमची माणसं यातीलच गोरगरिबांचा कार्यकर्ता आमदार करायचा त्याशिवाय गप्पा बसायचं नाही. यासाठी लवकरच मेळावा घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. तर बैठकीमध्ये महासंघाचे तालुका उपाध्यक्ष हिरलगे गावचे सरपंच सचिन देसाई यांची सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुधीर ऊफ॔ आप्पा गंगाराम शिवणे,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,तालुका सरचिटणीस प्रकाश पोवार,कार्याध्यक्ष बबन कळेकर, शहराध्यक्ष सागर कुराडे,शहर उपाध्यक्ष शिवाजी कुराडे,जय गणेश अध्यक्ष संजू पाटील,दीपक दादा शिवणे,युवा नेते युवराज बरगे, बाळासाहेब भैस्कर,शिवाजीराव रेडेकर,आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश हळदकर,मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम देसाई, युवक शहराध्यक्ष संतोष चौगुले, शिवसेना अध्यक्ष सागर मांजरे, मनोज पोवार,विश्वास खोत,संदीप मांडेकर,नाथा रेगडे सर,शैलेश इंगवले,विनायक पोवार,सुरज पवार, अशोक जगदाळे,धनंजय मोरबाळे, विजय केसरकर,स्वप्निल साळोखे,संजय दळवी,दिपक खांडेकर,गोपी पोवार,शैलेश पाटील, राजू बरगे उपस्थित होते.