गडहिंग्लज प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मानसिंग खोराटे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तुडये जिल्हा परिषद अंतर्गत अनेक गावांना भेट दिल्या. दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक जनतेशी थेट संवाद साधला, त्यांची प्रश्नं आणि अडचणी समजून घेतल्या, तसेच आपल्या विकासात्मक दृष्टिकोनाची व ध्येय धोरणावर चर्चा केली. यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले कि.. मी निवडणुकीच्या रिंगणात परिवर्तन घडवण्यासाठी उभा आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावागावांना भेटी देत असून जनतेने मांडलेले प्रश्न समजून घेहून ते प्रश्न सोडवण्यासाठी मि प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तसेच त्यानंतर हेरे पंचायत समिती गणअंतर्गत येणाऱ्या कोदारी,नगरगाव,गुळंब,करजगादे, पाले,मोटनवाडी,जेलुगडे,कलिवडे, किटवडे,सदावरवाडी या गावांना भेटी दिल्या. यावेळी पाणीपुरवठा,आरोग्य सेवा,शिक्षण,रोजगार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून गावनिहाय विकास आराखडा तयार करून सर्वांगीण विकास करू असे सांगितले. तसेच आपल्या भागांमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत ती उत्तमरित्या डेव्हलप करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतो. भागातील उद्योग, पर्यटन,आणि शेतीवर आधारित प्रकल्पांच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण काम करू अशा विविध ध्येयवादी धोरणांमुळे श्री.खोराटे यांनी सुज्ञ मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.
मानसिंग खोराटे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. रमाकांत गावडे,विठ्ठल गावडे,संजय सांबळेकर,तानाजी मेटकर,सुजित दळवी,आकाश दळवी,खेमाजी दळवी,विठ्ठल दळवी,वैजू गावडे, लक्ष्मण गावडे,परशराम गावडे, दत्ताराम परीट,कृष्णा नाईक,पांडुरंग गावडे,अमृत कांबळे-पाटील,टिळक कांबळे,रामचंद्र तावडे,शाहू सदावर यांचा समावेश होता.