Home Uncategorized दुंडगे येथे काँग्रेस मार्फत संसार उपयोगी भांडीसंचचे वाटप : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध योजना राबविण्याचा केला संकल्प

दुंडगे येथे काँग्रेस मार्फत संसार उपयोगी भांडीसंचचे वाटप : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध योजना राबविण्याचा केला संकल्प

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : दुंडगे (ता.गडहिंग्लज) येथे नूल जिल्हा परिषद मतदार संघातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडीसंच वाटप कार्यक्रम बुधवारी पार पडला. चंदगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख नेतेमंडळीं,पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संसार उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी केले.

तर यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात शासनाच्या विविध योजना कॉग्रेस नेते आ.सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे जेष्ठ नेते गोपाळराव पाटील,गोकुळ दूध संघाचे संचालक बयाजी शेळके,कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे,गडहिंग्लज बाजार समितीचे सभापती रामदास पाटील,गडहिंग्लज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष्य प्रशांत देसाई,दुंडगे गावाच्या सरपंच स्मिता पाटील,ज्योती धनवडे,दूंडयव्वा नाईक,मेघा कानडे,राजेंद्र पाटील,संजय करजगे,सदाशिव कानडे,प्रकाश देसाई,गजानन पाटील,बाबुराव नाईक,आकाश करमरे,नाना पाटील, गुरुगोंडा पाटील,अरुण किल्लेदार, सुभाष नवाळे,उदय तेलवेकर,कृष्णा शिंदे,पांडू करजगे,शिवगोंडा पाटील, जयानंद सुतार,बाळू सुतार,अशोक जाधव,बाळासाहेब सावंत,विलास सोलापुरे यांच्यासह भागातील व गावातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ,महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment