Home Uncategorized ‘संत गजानन’ अभियांत्रिकी व ‘एस. एफ.एस’ कंपनीत सामंजस्य करार

‘संत गजानन’ अभियांत्रिकी व ‘एस. एफ.एस’ कंपनीत सामंजस्य करार

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व बेळगाव येथील एस.एफ.एस. कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला.

करारात विद्यार्थ्यांना रोजगार व प्रशिक्षण देणे, व्याख्यानाचे आयोजन करणे, इंटनशिप उपलब्ध करणे, नवीन तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करणे या बाबीचा समावेश आहे. यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्ता वाढीसाठी या कराराची मदत होणार आहे.

यावेळी प्राचार्य डॉ.संजय सावंत, चंद्रशेखर कुलोळी,राहुल सावंत, सतीश भोसले,प्रा.संतोष गुरव,प्रा. सिदगोंडा जबडे, उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment