Home Uncategorized विश्वराज चव्हाण यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश

विश्वराज चव्हाण यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील विश्वराज संजय चव्हाण यांची देश पातळीवरील वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या राष्ट्रीय पात्रता (नीट )परीक्षेत उज्वल यश संपादन केले.

विश्वराज याला नीट परीक्षेत 720 पैकी 695 गुण प्राप्त करत संपूर्ण भारतात 3,064 वा क्रमांक पटकावले. या परीक्षेसाठी भारतातून 26 लाख विद्यार्थी परीक्षा दिली होती. यामध्ये विश्वराज यांचे यश म्हणजे सुवर्णक्षणच याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे शिक्षण न्यू होरायझन गडहिंग्लज व झा एज्युकेशन पुणे येथे झाले त्यांना आजोबा व संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे संस्थाध्यक्ष ॲड.अण्णासाहेब चव्हाण,आजी विजयमाला चव्हाण,वडील डॉ.संजय चव्हाण,आई डॉ.सुरेखा चव्हाण, डॉ.यशवंत चव्हाण,डॉ.प्रतिभा चव्हाण,ॲड.बाळासाहेब चव्हाण यांचे प्रोत्साहन तर डॉ.अमोल माने व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Related Posts

Leave a Comment