Home Uncategorized अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग स्पर्धेमध्ये कौतुकास्पद यश

अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग स्पर्धेमध्ये कौतुकास्पद यश

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : GRSA ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 अंतर्गत गडहिंग्लज रोलर स्केटिंग अकॅडमी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये पाच वर्षे वयोगटा खालील स्पर्धेमध्ये अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

कुमार रिधान,स्वप्निल चव्हाण(नर्सरी) यांनी गोल्ड मेडल तसेच सहा वर्षे वयोगटाखालील स्पर्धेमध्ये कुमार अभिनव गोडघाटे (फर्स्ट स्टँडर्ड)या विद्यार्थ्यांने गोल्ड मेडल पटकाविले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका पूजा पाटील तसेच सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचा टिचिंग, नॉन टिचिंग स्टाफ तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment