Home Uncategorized गडहिंग्लजच्या ‘अभिनव’ ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा

गडहिंग्लजच्या ‘अभिनव’ ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये आज(शुक्रवार) अभियंता दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन इंजिनियर धनाजी कल्याणकर व इंजिनीयर बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी इंजि.धनाजी कल्याणकर व इंजि.बाबासाहेब पाटील यांनी अभियंता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना गिफ्ट दिले.

तसेच न्यू.एस.एस.इलेक्ट्रॉनिक्स इंजि. सचिन शेंडगे यांचीही विद्यार्थ्यांनी भेट घेतली. सर्व इंजिनियर्सनी मुलांना पुढील आयुष्यामध्ये मोठे होऊन उच्च पदावर विराजमान व्हा.. असा आशीर्वाद दिला. विद्यार्थ्यांना हा वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला आणि त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस एक प्रेरणा मिळाली. यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा पाटील, समन्वयक श्रीमती विमल वांद्रे तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

Related Posts

Leave a Comment