Home Uncategorized गडहिंग्लज तालुक्यात बस फेऱ्या वाढवा : युवा सेनेची मागणी

गडहिंग्लज तालुक्यात बस फेऱ्या वाढवा : युवा सेनेची मागणी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वाढती विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सध्याच्या बस फेऱ्या अपुऱ्या पडत असून गडहिंग्लज तालुक्यात बस फेऱ्या वाढवण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आगार प्रमुखांकडे केली आहे.

तालुक्यातून गडहिंग्लज शहरामध्ये शाळा व महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. गावातून शिक्षणासाठी गडहिंग्लजमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना महामंडळाची एसटी सेवा प्रमुख साधन आहे. पण वाढती विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सध्याच्या बस फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी आगार व्यवस्थापनांने तालुक्यातील खेडेगावातील बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन गैरसोय होणाऱ्या गावामध्ये जादा बस सोडून सहकार्य करावे. अशा आशयाचे निवेदन युवासेने मार्फत देण्यात आले आहे.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अवधुत पाटील,कृष्णा पाटील,महेश पाटील,बाबुराव नाईक,सागर हेब्बाळे,विक्रम मुतकेकर,राजकुमार भोगन,रोहीत डावरे,शकील मुल्ला,संदेश वाघराळकर,सुमित कोरवी,तेजस घेवडे,रोहन तिपे,अब्दुल देसाई,प्रवीण तहसीलदार,शुभम येडुर यांच्यासह युवासैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment