Home Uncategorized कौलगेत नेत्रदानाचे सप्तक : दुःखद प्रसंगीही ‘भुईंबर’ कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कौलगेत नेत्रदानाचे सप्तक : दुःखद प्रसंगीही ‘भुईंबर’ कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील शेवंता दत्तात्रय भुईंबर (वय ७७) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. कौलगे गावातील हे सातवे तर चळवळीतील हे ९२ वे नेत्रदान ठरले. दुःखद प्रसंगीही सामाजिक बांधिलकी जपत भुईंबर कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

शेवंता भुईंबर यांची गेल्या काही दिवसापासून प्रकृती अत्यवस्थ होती. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गडहिंग्लज, आजरा तालुक्यात सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीची माहिती भुईंबर कुटुंबीयांना होती. त्यांनी शेवंता यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. चळवळीतील कार्यकर्त्यांना याची कल्पना दिल्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी कौलगे येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.

शेवंता भुईंबर यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (ता.३०) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.

Related Posts

Leave a Comment