Home Uncategorized मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी गडहिंग्लजच्या दौऱ्यावर : गडहिंग्लज नगरीमध्ये होणार जंगी स्वागत

मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी गडहिंग्लजच्या दौऱ्यावर : गडहिंग्लज नगरीमध्ये होणार जंगी स्वागत

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी(ता-१५) रोजी गडहिंग्लजच्या दौऱ्यावर येणार असून गडहिंग्लज नगरीमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेनंतर मंत्री हसन मुश्रीफ पहिल्यांदाच गडहिंग्लजला येत आहेत. शनिवारी(ता-१५) रोजी सायंकाळी चार वाजता मंत्री हसन मुश्रीफ ग्रामदैवत श्री. काळभैरी देवाचे दर्शन घेतील,वीरशैव चौकातील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्यास अभिवादन करून श्री. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांना व प्रांत ऑफिससमोरील महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नगरपालिकेच्या प्रांगणात सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील.

आज शनिवार(ता-११) सकाळी १० वाजता गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने गडहिंग्लज शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक झाली.बैठकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. बैठकीस गडहिंग्लज शहर व गिजवणे-कडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment