गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील श्री. संत बाळूमामा मंदिर देवस्थान संस्थानला भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. पण प्रसादालयाची इमारत नसल्याने पावसाळ्यात भक्तांची खूपच अडचण होते असल्याने मंदिर परिसर विकसित झाला पाहिजे अशी भाविकांतुन मागणी होत असताना आज ट्रस्ट मार्फत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे अग्नीगृह,अन्नछत्र प्रसादालय व दर्शन मंडप यासाठी दोन कोटींचा विकास आराखडा निवेदन सादर केले. यावेळी तत्काळ प्रस्तावाला तातडीने तत्वत: मंजुरी देऊन प्रादेशिक पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास मधून निधी उपलब्ध करून देऊ असे शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी श्री संत बाळूमामा मंदिर देवस्थान संस्थानचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे,माजी नगरसेवक इंजि. चंद्रकांत सावंत, विठ्ठल भमानगोळ,एम.एन.कोल्हापूरे,उदयराव जोशी,राजशेखर दड्डी,सुरेश कोळकी,गोड साखर संचालक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील,संचालक प्रकाश पताडे,अर्बन बँकेचे संचालक अरविंद कित्तूरकर,जवाहर घुगरे, आण्णासाहेब देवगोंडा,हिरा शुगर संचालक सोमगोंडा आरबोळे,अजित विटेकरी,अमर मांगले,राहुल शिरकोळे उपस्थित होते.