Home Uncategorized आंबेओहोळ प्रकल्पामुळे उत्तूर परिसराच्या हरितक्रांतीला चालना : मंत्री हसन मुश्रीफ प्रतिपादन

आंबेओहोळ प्रकल्पामुळे उत्तूर परिसराच्या हरितक्रांतीला चालना : मंत्री हसन मुश्रीफ प्रतिपादन

by Nitin More

उत्तूर प्रतिनिधी : आंबेओहळ प्रकल्प उत्तूर विभागाच्या हरितक्रांतीचा वरदायिनी आहे. या प्रकल्पाची पूर्तता माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद असून यामुळे या परिसरातील हरितक्रांतीला चालना मिळाली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

उत्तुर विभागातील आराध्य दैवत श्री. जोमकाईदेवीचे दर्शन घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी भादवणवाडी, जाधेवाडी,खोराटवाडी,मासेवाडी, हालेवाडी,वडकशिवाले,महागोंड, वझरे,महागोंडवाडी व चिमणे आदी. गावांमध्ये आयोजित संपर्क बैठकांमध्ये ते बोलत होते. आजरा कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, काशिनाथ तेली,जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,महादेव पाटील,शिरीष देसाई,दीपक देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पंधरा वर्षापूर्वी हा उत्तूर विभाग कागल मतदारसंघाला जोडल्यानंतर कागलच्या बरोबरीनेच या विभागालाही विकासकामात अग्रेसर ठेवले. कागल गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ विकासकामात देशात अव्वल बनवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले. अनेक नाविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रम या परिसरात केल्यामुळे गावागावात समृध्द वैभव निर्माण करता आले.

आजरा कारखान्याची चेअरमन वसंतराव धुरे म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात आमचा समावेश झाल्यानंतर परिसरातील प्रत्येक गाव खेड्याचा चेहरा बदलण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केलं आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नेहमीप्रमाणे या विभागाने प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन धुरे यांनी केले. तर काशिनाथ तेली म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी विभागात गेल्या पंधरा वर्षात विकासकामांचा धडाका लावला आहे. मात्र विरोधी उमेदवार केवळ टीकाटिपणी करण्यातच धन्यता मानत आहेत.

स्वागत व प्रास्ताविक अंबाजी कांबळे यांनी केले. सरपंच महादेव दिवेकर, उपसरपंच कृष्णा परीट, सुरेश पाटील, तर जाधेवाडी येथे मधुकर भुजंग,वसंतराव धुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गणपती सावंत, बापू भुजंग,बाजीराव सावंत,पांडुरंग रावण,प्रभाकर सावंत,शिवाजी सावंत,विश्वास बरडे तर मासेवाडी येथे सरपंच स्वाती आजगेकर,उपसरपंच संजीवनी येजरे,गुंडोपंत खोराटे तसेच हालेवाडी येथे सरपंच बनाबाई शिंदे,माजी सरपंच अनिल बैलकर,बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

माता-भगिनींचा वनवास संपला..!

जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी आंबेओहोळ प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी मंत्री मुश्रीफांवर सोपवली होती सक्षमपनाने मंत्री मुश्रीफांनी हा प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पामधून २२ गावांमधील वीस हजारावर एकर शेतीमध्ये हरितक्रांती झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई संपून माता भगिनींचा वनवास कायमचा थांबला आहे.

Related Posts

Leave a Comment