Home Uncategorized बामणीत समरजीत घाटगे गटाला ‘भगदाड’ : समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकत असंख्य कार्यकर्ते मुश्रीफ गटात

बामणीत समरजीत घाटगे गटाला ‘भगदाड’ : समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकत असंख्य कार्यकर्ते मुश्रीफ गटात

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : आज(रविवार) बामणी(ता.कागल) येथील विजय जालिंदर कांबळे,जालिंदर देवबा कांबळे,अशोक देवबा कांबळे,गौतम देवबा कांबळे,अमर तानाजी कांबळे,रोहिदास रामचंद्र सोरटे,अनिल रघुनाथ जिरगे,शशिकांत पांडुरंग कांबळे,नागेश सदाशिव कांबळे,स्वप्निल प्रल्हाद कांबळे,विनोद दगडू कांबळे,दत्तात्रय सुरेश कांबळे, जनार्दन रामचंद्र कांबळे यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बामणीतील प्रमूख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तर जनतेच्या प्रश्नांसाठी सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन.

यावेळी माजी सरपंच रावसाहेब पाटील,युवराज पाटील,ॲड.सुशांत पाटील,शिवाजीराव मगदूम,महादेव कोईगडे,रामचंद्र चौगुले,सचिन मगदूम,सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment