Home Uncategorized श्री बसवेश्वर प्रतिष्ठानमार्फत गणेश मंडळांचे स्वागत : वृक्षांची रोपे देऊन वृक्षारोपणाचा दिला संदेश.!

श्री बसवेश्वर प्रतिष्ठानमार्फत गणेश मंडळांचे स्वागत : वृक्षांची रोपे देऊन वृक्षारोपणाचा दिला संदेश.!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील बसवेश्वर चौक येथे अनंत चतुर्दशी निमित्त श्री बसवेश्वर पुतळा प्रतिष्ठानमार्फत शहर आणि परिसरातील विसर्जनासाठी निघालेल्या मंडळांचे स्वागत करून त्यांचे सत्कार करण्यात आले.

सुरुवातीला म.नि.प्र सिद्धेश्वर महास्वामीजींच्या यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. येणाऱ्या प्रत्येक मंडळाला नारळ,सुपारी आणि विविध वृक्षांचे रोप देऊन वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. वनअधिकारी सागर पोवार यांनी विविध वृक्षांची रोपे देऊन सहकार्य केले.

यावेळी मंचावर महंत सिद्धेश्वर महास्वामीजी, तहसीलदार ऋषिकेत शेळके,पोलिस निरीक्षक अजय सिंदकर,सुरेश कोळकी,राजशेखर दड्डी,राजेंद्र तारळे,विलास रामनकट्टी,प्रीतम कापसे,बसवराज आजरी,संकेत बेल्लद,सचिन घुगरे,प्रवीण मेनशी,किरण कदम,रामदास कुराडे,लक्ष्मण पोवार,महेश घुगरे,मनीष कोले उपस्थित होते. दिवसभरातून विविध मान्यवरांच्या हस्ते येणाऱ्या मंडळांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व लिंगायत समाजबांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment