गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून ( ता.९ ) पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. युनायटेडचे माजी अध्यक्ष सुनिल चौगुले यांच्या स्मृती पित्यर्थ या स्पर्धा होत आहेत. एम.आर.हायस्कुल मैदानावर दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत स्थानिकसह सोलापूर, कोल्हापूर आणि लगतच्या बेळगावच्या नामवंत शालेय संघाना निंमत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
स्व. सुनिल चौगुले यांनी गडहिंग्लज युनायटेडच्या माध्यमातून गडहिंग्लजच्या फुटबॉल विकासात मोलाचे योगदान दिले आहे. खासकरून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात त्यांचा पुढाकार होता. नव्या पिढीला त्यांच्या योगदानाची माहिती व्हावी या उद्देशाने गतवर्षापासून त्यांच्या स्मृतीपित्य़र्थ हि पंधरा वर्षाखालील स्पर्धा सुरु करण्यात आली. गतवर्षी स्थानिक असणारे स्पर्धेचे स्वरुप यंदा वाढविण्यात आले आहे. स्थानिक शालेय खेळाडूंना परगावच्या नामवंत संघाशी दोन हात करण्याची संधी या स्पर्धेतून देण्यात आली आहे. सन २०११-२०१२ जन्म झालेले विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.
शनिवारी स्थानिक संघात बाद पध्दतीने सामने होतील. रविवारी सकाळी यातील विजयी संघाची उपात्यंपुर्व फेरीत बेळगाव,कोल्हापूर, सोलापूर संघाशी लढत होईल. त्यातील विजेत्या चार संघात दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने आहेत. सायंकाळी पाच वाजता अंतिम सामना होईल. विजेत्या, उपविजेत्या संघासह स्पर्धा वीर, उत्कष्ठ गोलरक्षक,बचावपटू, मध्यरक्षक,आघाडीपटू यांना वैयक्तीक बक्षिसे आहेत. तरी शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शौकिनांनी उपस्थित रहावे असे आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी,उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे. स्पर्धा समन्वयक सत्यम पाटील, सक्षम तोंदले आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.