गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील वानखात्यात कार्यरत असणारे वनपाल सागर पांडुरंग यादव (वय -४३) यांनी झाडे तोडणी व वाहतूक करण्यासाठीचा परवाना अर्ज वरिष्ठ कार्यालयास पाठवणे कामी अर्जदार ईश्वर महादेव घाळी (वय-२८ रा-शेंद्री) यांचेकडे ६०००/- हजाराची लाच मागतल्या प्रकारणी आज गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी कि ईश्वर महादेव घाळी यांनी वनविभागाकडे झाडे तोडणे व वाहतूक करणेकरिता परवाना मिळावा याकरिता अवशक्य कागदपत्रासह रीतसर अर्ज २८ एप्रिल रोजी केला होता. तर दुसऱ्या दिवशी सदरच्या अर्जाच्या चौकशीकामी गेले असता. तेथील वनपाल सागर यादव यांनी अर्ज चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देणे कामी सहा हजार रुपये मला द्यावे लागतील अशी मागणी ईश्वर घाळी यांचेकडे केली.
त्यानंतर ईश्वर घाळी यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांचेकडे वनपाल सागर यादव यांच्या विरुद्ध तक्रार केली. अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी पडताळणी केली. यामध्ये वनपाल सागर यादव यांनी लाच रक्कम तडजोडअंती ५०००/- मागितलेचे निष्पन्न झाले. त्यानंतर सागर यादव यास कोल्हापूर येथून अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी ताब्यात घेतले तर घडलेल्या घटनेनुसार व फिर्यादी ईश्वर घाळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर यादव यांच्यावर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला (अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर) करीत आहेत.