Home Uncategorized हणमंतवाडी-खमलेहट्टी पाझर तलावाचे काम निकृष्ट : तलावात अर्धनग्न आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा ईशारा

हणमंतवाडी-खमलेहट्टी पाझर तलावाचे काम निकृष्ट : तलावात अर्धनग्न आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा ईशारा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज तालुक्यातील हणमंतवाडी-खमलेहट्टी पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून तत्काळ तलावाचे काम करावे अन्यथा तलावामध्ये अर्धनग्न आंदोलन करण्याचा ईशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी,मृद जलसंधारण विभाग कोल्हापूर व तहसीलदार कार्यालय यांना निवेदनद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे कि आम्ही चार गावचे शेतकरी-ग्रामस्थ आपल्याला दिनांक ४ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे हणमंतवाडी-खमलेहट्टी पाझर तलाव निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल कळवले होते. परंतु आज पर्यंत संबंधित विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारचे काम घालू केले नाही. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती करीत आहोत. जर चार ते पाच दिवसांमध्ये पाझर तलावाचे काम सुरू झाले नाही तर आम्ही शेतकरी ग्रामस्थ पाझर तलावामध्ये अर्धनग्न आंदोलन करीत आहोत.

निवेदनावर फुलाजी खैरे,संतोष सळकुडे,दयानंद चोगुले,संभाजी घुगरे यांच्या सह्या आहेत.

Related Posts

Leave a Comment