Home Uncategorized भाजपा स्थापना दिनानिमित्त गडहिंग्लजमध्ये ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन उत्साहत संपन्न

भाजपा स्थापना दिनानिमित्त गडहिंग्लजमध्ये ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन उत्साहत संपन्न

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील भाजपच्या नवीन कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वात तब्बल दिड कोटीचे सभासद नोंदणी उद्दीष्टपुर्ती निमित्त भाजपच्या स्थापना दिनी मजबुत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन उत्साहत संपन्न झाले. यावेळी ऑनलाईन संमेलनात नागपूरहुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण,मुंबई महानगर अध्यक्ष,सांस्कृतिक तथा आयटी मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी,370 कलम हटविणे,नोट बंदी,वन नेशन‌ वन टॅक्स,वन‌ नेशन‌ वन‌ इलेक्शन,नागरीकत्व सुधारणा कायदा,ट्रीपल तलाक रद्द कायदा, भारतीय न्याय संहितेसह तीन नवे फौजदारी कायदे,वक्फ सुधारणा विधेयक व गेम चेंजर लाडकी बहिण योजना यासह केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांवर भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मार्गदर्शन केले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जनसंघ ते भाजप स्थापनेचा इतिहास मार्तंड जरळी यानी उलगडून दाखवला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,महिला शहराध्यक्षा निलांबरी भुईंबर,महिला मोर्चा शहर सरचिटणीस भारती सावंत,महिला जिल्हा उपाध्यक्षा अर्चना रिंगणे,अनिल खोत,विश्वनाथ खोत,डॉ.संतोष पेडणेकर,संध्या नाईकवाडी,द्राक्षायणी घुगरे,सचिन घुगरे,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील,अनिल गायकवाड, संदिप कुरळे,मनिषा कुरळे,दिपा कुलकर्णी,पुष्पा चव्हाण यांच्यासह पक्षाचे युवा पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर कार्यक्रमानंतर तालुकाध्यक्ष प्रितम कापसे यांनी आभार मानले.

Related Posts

Leave a Comment