Home Uncategorized …आम्ही ‘कोण’ या प्रश्नाचे उत्तर जनतेनेच ‘आपल्याला’ वेगवेगळ्या निवडणुकात संधी देऊन दिलेले आहे : सतीश पाटील

…आम्ही ‘कोण’ या प्रश्नाचे उत्तर जनतेनेच ‘आपल्याला’ वेगवेगळ्या निवडणुकात संधी देऊन दिलेले आहे : सतीश पाटील

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : मतदारसंघासह जिल्हातील अन् राज्यातील समाजकारण-राजकारणात असणाऱ्या सर्वांना तसेच सर्वसामान्य जनतेला मंत्री हसन मुश्रीफ हे जनतेचे सेवेकरी आहेत हे सांगायला कुठल्या जोतिष्याची गरज नाही. तर आम्ही ‘कोण’ या प्रश्नाचे उत्तर जनतेनेच आपल्याला वेगवेगळ्या निवडणुकात संधी देऊन दिलेले आहे. असे मत कारखाना संचालक सतीश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

पत्रकात म्हटलं आज कि आप्पासाहेब नलवडे सहकारी कारखाना ज्यावेळी अडचणीत होता त्यावेळी कारखाना तत्कालीन संचालकांच्या व शेतकरी,सभासद, कामगारांच्या विंनती नुसार ब्रिस्क कंपनीला आणून कारखाना चालवीण्याचा प्रयत्न मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून झाला. त्यानंतर पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळी एकहाती सत्ता सभासदांनी मंत्री मुश्रीफ यांच्या पॅनेलला दिली. दरम्यान कारखाना विस्तारीकरणासाठी 55 कोटी देऊन कारखाना उर्जीतावस्थेला आणण्याचा प्रयत्न केला हे सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. याशिवाय जिल्ह्यातील शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ व जिल्हा बँकेलाही सहकारात अव्वल स्थान मिळवून देण्याचे महान कार्य मुश्रीफसाहेंबाच्या मार्गदर्शनात होत आहे. हे सर्व शेतकरी आणि सभासद जाणून असल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ‘सहकार महर्षी’ म्हणून सारी जनता आदराने पाहते आहे.

‘मि’ देखील मुश्रीफसाहेंबाचे अनुकरण करीत एक सेवेकरी म्हणून काम करत असताना सहकारी संस्था, शिक्षण संस्था जनहित नजरेसमोर ठेवून प्रामाणिक व सहकारला अनुसरुन संस्था सहकारात पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच आजवर जनतेने मला ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, जिल्हापरिषद उपाध्यक्ष,बँक संचालक व कारखाना संचालक अशा विविध ठिकाणी संधी देऊ केल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात मंत्री हसन मुश्रीफ व माझ्या बाबतीत आदराचे स्थान असून जनतेचे आम्ही सेवेकरी आहोत येथून पुढेही जनतेची सेवा करत राहणार आहोत. त्यामुळे आम्ही ‘कोण’ या प्रश्नांचे उत्तर जनतेनेच वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या निवडणुकात संधी देऊन दिलेले आहे.

Related Posts

Leave a Comment