गडहिंग्लज प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठामार्फत एप्रिल-मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये गडहिंग्लज (ता. महागाव) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयातील तब्बल ११ विद्यार्थी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’ गुणवत्ता यादीत झळकत गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. दरवर्षी मिळणारे यश म्हणजे महाविद्यालयाच्या प्रगतीला आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाला मिळालेली मोठी दाद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या यशात इलेक्ट्रॉनिक्स विभागातील अनुराधा पाटील व इलेक्ट्रिक विभागातील जयश्री होळी या विद्यार्थिनींनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाचा मान उंचावला. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकलमधून रिद्धी दोरुगडे (द्वितीय),सानिका सावंत(तृतीय), सानिका शिंगटे(चौथा),निहा राऊत(सातवा),राहुल दरुटे(दहावा), इलेक्ट्रॉनिक्स विभागातून ऋतुजा मोरबाळे(द्वितीय),साक्षी दावणे (आठवा),मेकॅनिकल मधून सत्यम चौगुले(पाचवा),विवेक मोरये (आठवा)क्रमांक पटकावत पहिल्या दहामध्ये आपले स्थान पक्के केले.
संस्थाध्यक्ष ॲड.डॉ.अण्णासाहेब चव्हाण यांनी यश मिळालेल्या
विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत म्हणाले ‘विद्यार्थ्यांनी प्रामाणिक मेहनत,चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. प्रति वर्षाप्रमाणे गुणवत्ता यादीत याही वर्षी विद्यार्थ्यांना मिळालेले स्थान अभिमानास्पद बाब असून हे आमच्या संस्थेसाठी कौतुकास्पद आहे. या यशामागे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व पालकांचा मोठा वाटा आहे. आमचे विद्यार्थी भविष्यातही ज्ञान,कौशल्य आणि चारित्र्य यांच्या जोरावर समाजहितासाठी कार्य करतील याचा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी विश्वस्त डॉ.यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण,सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत सहयावेळी रजिस्टार प्रा.शिरीष गणाचार्य,प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत,उपप्राचार्य डॉ.सचिन मातले,प्रा.अमरसिंह फराकटे,प्रा. शिवलिंग स्वामी,डॉ.अमोल माने,प्रा. विनायक घाटगे,प्रा.सचिन गावडे,डॉ. प्रदीप चिंधी,प्रा.महेश भांदिगरे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.