गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील बंडू दत्तू माने यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. अत्याळ गावातील आठ दिवसांतील दुसरे तर एकूण ३८ वे नेत्रदान आहे.
बंडू माने यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले. त्यांचा मुलगा प्रकाश माने यांचा नेत्रदान चळवळीत सुरवातीपासूनच सक्रिय सहभाग आहे. त्यांनी वडीलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दु:खद प्रसंगातही सामाजिक भान जपत चळवळीतील सहभागाला कृतिशीलतेची जोड दिली.
बंडू माने यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता.१) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.