Home Uncategorized ‘टाईम मॅनेजमेंट’ निश्चित ध्येय गाठण्यासाठी अंत्यत महत्वाचे- डॉ. अमोल पाटील

‘टाईम मॅनेजमेंट’ निश्चित ध्येय गाठण्यासाठी अंत्यत महत्वाचे- डॉ. अमोल पाटील

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ‘टाईम मॅनेजमेंट’ जीवनात निश्चित ध्येय गाठण्यासाठी अंत्यत महत्वाचे असल्याचे डॉ. अमोल पाटील यांनी मार्गदर्शनपर पालक मेळाव्यात सांगितले ते अभिनव ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मुलांची स्वप्ने पालकांनी स्वतःच्या अंतरात्म्याच्या अनुभूतीतून कसं बघायचं हे डॉ.अमोल सरांनी पालकांना कृतीद्वारे आत्मचिंतनाची अनुभूती दिली.

तसेच यावेळी अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक नियोजन वेळापत्रक पालकांना समजावून सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रा.संदीप पाटील यांनी करताना अभिनव अकॅडमी मानवी मन ह्युमन बेईंग कसे तयार करते हे समजण्यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनामध्ये विद्यार्थ्यांचे टास्क रिपोर्टिंग होमवर्क लेक्चर शेड्युल डॉ.तुकाराम वांद्रे यांनी स्पष्ट केले. पालक मेळाव्यासाठी अभिनव एजुकेशन सोसायटीचे सचिव प्रा.संतोष पाटील प्रा.हेमंत संकपाळ,संचालक अजित पवार प्राचार्य अभिजीत पाटील, प्रा.प्रशांत कळके,प्रा.सोमेश जाधव व सर्व स्टाफ उपस्थित होता. आभार प्रा.राऊत खेडे यांनी मानले.

Related Posts

Leave a Comment