गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील सरस्वती नगरमधील विठाबाई बाबूराव पाटील (वय ७६) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गडहिंग्लज शहरातील हे नववे नेत्रदान आहे. चळवळीत गेल्या महिन्याभरात सातवे नेत्रदान झाले आहे.
विठाबाई पाटील यांचे सरोळी, (ता.आजरा) हे मूळ गाव. त्यांचे
शुक्रवार (ता -१) पहाटे ५.३० च्या सुमारास निधन झाले. नातेवाईकांनी नेत्रदानाचा निर्णय घेऊन येथील अंकूर आय बँकेशी संपर्क साधला. यानंतर अंकुर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या मागे पती,दोन मुले,मुलगी,सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता-३) रोजी आहे.