गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील ॲक्सिस बँकेच्या ‘एटीएम’ मध्ये पाचशे रुपयांच्या ३५ बनावट नोटा डिपॉझिट करून १७५००/- रुपयांची बँकेची फसवणूक केले प्रकरणी गडहिंग्लजच्या युवकावर गुन्हा दाखल झाला असून आकाश रवींद्र रिंगणे(रा-खोत गल्ली,नदीवेस गडहिंग्लज) असे त्या युवकाचे नाव आहे.
गडहिंग्लज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि मंगळवार(ता-१७) रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास आकाश रिंगणे याने गडहिंग्लज येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये त्याच्या खात्यावर ३५ पाचशे रुपयांच्या नोटा (रक्कम-१७५००/-)डिपॉझिट केल्या. बँकेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची लेन-देन पडताळणी करत असताना ब्रँच ऑपरेशन हेड गौरव गिरीश खरबुडे यांना निदर्शनास आले. बनावट नोटा डिपॉझिट करून बँकेची फसवणूक केलेचे लक्षात आले. त्यानुसार गौरव गिरीश खरबुडे यांनी फसवणूक केले बाबतची फिर्याद पोलिसात दाखल केली असून आकाश रिंगणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय सिंदकर करीत आहेत.