Home Uncategorized युनायटेडतर्फे रविवारी फुटबॉलपटूंचा होणार गौरव;भारतीय संघाचे प्रशिक्षक बिबियानो फर्नाडिंसांची उपस्थिती

युनायटेडतर्फे रविवारी फुटबॉलपटूंचा होणार गौरव;भारतीय संघाचे प्रशिक्षक बिबियानो फर्नाडिंसांची उपस्थिती

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे या गत हंगामातील यशस्वी फुटबॉलपटूंचा गौरव होणार आहे. रविवारी (ता.२२) सकाळी अकरा वाजता एमआर हायस्कुलच्या मैदानावर वरिष्ठ,१४ आणि १६ वर्षाखालील ५० खेळाडूंचा सत्कार होईल. भारतीय युवा संघाचे प्रशिक्षक गोव्याचे बिबियानो फर्नांडीस हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

गडहिंग्लज युनायटेडच्या फुटबॉलपटूंनी गतहंगामात सांघीक आणि वैयक्तीक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकिक वाढविला आहे. युनायटेडच्या अभिषेक पोवारने बंगळूरच्या आर्मी फुटबॉल संघात थेट हवालदारपदी तर शुभम आजगेकरची नौदलात निवड झाली आहे. श्रवण जाधवची सेसा अँकाडमीत तर धीरज कुरबेट्टी, अनमोल तरवाळ, सुमीत पन्नोरे, स्वरूप शेटके यांची बदोडा एफसीमधून युवा आय लीगसाठी निवड झाली. तानाजी देवेकर आणि ओमकार घुगरीने डी लायसन्स प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली. यासीन नदाफ, सागर पोवार यांची खुल्या तर अभिषेक सासनेची तेरी वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा संघातून चांगला खेळ केला.

गोव्याचे बिबियानो फर्नाडींस यांनी खेळाडू म्हणून चर्चिल ब्रदर्स,धेंपो, वास्को,स्पोर्टिंग गोवा,फ्रान्सासह कोलकत्याचा ईस्ट बंगाल सारख्या नामंवत संघातून १४ वर्षे मैदान गाजविले. गेल्या आठ वर्षांपासून भारतीय सतरा,वीस वर्षाखालील संघाना मार्गदर्शन केले. दोन वर्षे इंडियन सुपर लीगमधील बंगळूरू एफसीच्या राखीव संघाला त्यांनी प्रशिक्षण दिले. दक्षिण आशियाई (सँफ) आणि बंगळूर लीगचे विजेतेपद त्यानी पटकाविले आहे. देशातील नव्या पिढीतील प्रतिभावान प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, कोल्हापूर जिल्हा बँकेंचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर,चंदगडच्या क्रीडा अधिकारी मनिषा पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी खेळाडू,शौकीनांनी उपस्थित रहावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष डॉ. रविंद्र हत्तरकी,उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केले आहे.


बंगळूरमध्ये उपविजेतेपद..!
गडहिंग्लज युनायटेडने वरिष्ठ, १६, १४ अशा सर्वच गटात यश मिळवून खेळाडू घडविण्याची प्रक्रिया अधोरेखित केली. खासकरून बंगळूरच्या सोळा वर्षाखालील फ्रिडम ट्रॉफी स्पर्धेत केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगणा, गोवा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र अश्या सहा राज्यांचा सहभाग असणा-या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून मुसंडी मारली. कोल्हापूरच्या रायझिंग स्टार्स चौदा वर्षांखालील गटात उपविजेतेपदासह केएसए ग्रामीण लीग स्पर्धेचे विक्रमी सातव्यांदा अजिंक्यपद मिळवून वर्चस्व राखले.

Related Posts

Leave a Comment