गडहिंग्लज प्रतिनिधी – सध्याच्या स्पर्धात्मक युगात महिलांनी स्वावलंबी बनने फार गरजेचे आहे. त्याला जिद्द आणि कष्टाची जोड असेल तर महिला नक्कीच यशस्वी होतील असे प्रतिपादन राजश्री कोले यांनी व्यक्त केले. त्या वैरागवडी येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पी.के.पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान अशोक बिरंजे याच्या स्मारकाला वंदन करून,सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रास्ताविक एकता पाटील यांनी केले तर उपसरपंच उत्तम पाटील यांनी स्वागत केले. सौ कोले पुढे म्हणाल्या की सध्याच्या युगात आपण चूल अन् मूल एवढेच मर्यादित न राहता स्वतःच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या कुटुंबही कसे सुस्थितीत ठेवले पाहिजे याविषयी माहिती दिली. अनेक क्रांतिकारक महिलांची उदाहरणे देऊन त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन काम केले पाहिजे. तरच आपण या स्पर्धात्मक युगात टिकणार आहोत. असे अनमोल मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती संभाजी पाटील,उत्तम पाटील,रविंद्र पाटील,गणपती पाटील,युवराज बिरंजे,मारूती गोते, जयश्री पाटील,सुनिता पाटील,लक्ष्मी बिरंजे,शितल पाटील यांची होती.गावातील सर्व महिला त्याचबरोबर नागरिक उपस्थित होते.आभार सरपंच पी.के. पाटील यांनी मानले.