Home Uncategorized जवान अमर देसाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करा : नुल ग्रामस्थांची मागणी

जवान अमर देसाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करा : नुल ग्रामस्थांची मागणी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कसबा नूल येथील वीर जवान अमर भिमगोंडा देसाई सध्या राहणार संकेश्वर रोड, गडहिंग्लज. हे जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर कार्यरत असून सुट्टीवर घरी आल्यावर त्यांची पत्नी तेजस्वीनी हिने हेब्बाळ येथील संशयित साथीदार राऊत याच्या मदतीने अमर देसाई यांचे हातपाय व डोळे बांधून विषारी किटक नाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या अमर हे आर्मी हाॅस्पिटल,पुणे येथे उपचार घेत असून प्रक्रृती गंभीर आहे. तेव्हा यातील दोषींवर कडक कारवाई करावी असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,नूल येथील ग्रामस्थ व आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यानी गडहिंग्लजचे पोलिस निरिक्षक गजानन सरगर याना दिले.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत,आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष सावंत,भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा प्रा.अनिता चौगुले,शहर महिला अध्यक्षा निलांबरी भुईंबर,शहर महिला चिटणीस भारती चंद्रकांत सावंत ,आजी माजी सैनिक वेल्फेअर संघटनेचे तालुका अध्यक्ष कुमार पाटील,सचिव रामकृष्ण शेंडे, खजिनदार रमेश देसाई, भाजप तालुका उपाध्यक्ष कुमार देसाई,सुरेश देसाई यांच्यासह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Posts

Leave a Comment