Home Uncategorized गडहिंग्लजमध्ये सोमवारपासून श्री.संत बाळूमामा व हालसिध्दनाथ देवाचा भंडारा महोत्सव

गडहिंग्लजमध्ये सोमवारपासून श्री.संत बाळूमामा व हालसिध्दनाथ देवाचा भंडारा महोत्सव

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : श्री.संत बाळूमामा व श्री हालसिध्दनाथ मंदिर सेवा संस्थान,गडहिंग्लज यांचेमार्फत सालाबादप्रमाणे श्री.संत बाळूमामा व श्री.हालसिध्दनाथ देवाचा भंडारा महोत्सव करण्याचे नियोजन केले असून यंदाच्या वर्षीचा 9 व्वा भंडारा महोत्सव आहे.

भंडाऱ्यानिमित्त सोमवार (ता -१९) ते बुधवार (ता -२१) पर्यंत दररोज सायंकाळी सहा वाजता मंदिर आवारात मेजर विक्रम जगताप यांचे “श्री संत बाळुमामा महात्म्य” या विषयावर प्रवचन तर गुरुवार (ता-२२) रोजी दुपारी ३ वाजता प.पू.श्री गुरुसिध्देश्वर महास्वामीजी श्री सुरगेश्वर मठ,क।। नूल यांच्या अमृतहस्ते पालखी सोहळा – नगरप्रदक्षिणा व त्याच रात्री ८ वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम व रात्री ९ वाजता मंदिरात श्री.भगवान डोणे महाराज,वाघापूर यांची ‘भाकणूक’

तर शुक्रवार (ता-२३) रोजी सकाळी ९.३० वाजता श्री दत्त मंदिर लोकार्पण आणि श्री विठ्ठल रखुमाई व श्री मुळे महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा म.नि.प्र जगद्‌गुरु श्री.शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिध्द संस्थान मठ,निडसोशी प.पु. षटस्थळब्रम्ही गुरुसिध्देश्वर महास्वामीजी श्री.सुरगीश्वर मठ,क।। नुल यांच्या अमृत हस्ते व श्री रामनाथगिरी समाधी मठ क।। नुलचे मठाधिश प.पु.भगवानगिरी महाराज आणि जडेयसिध्देश्वर गडहिंग्लज मठाचे मठाधिपती प.पू.श्री.महांत सिध्देश्वर महास्वामिजी,प.पू.श्री. किसन महाराज,भडगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला असून सर्व कार्यक्रमास भाविक -भक्तांनी उपस्थिती रहावे असे आवाहन विश्वस्त श्री संत बाळूमामा व हालसिध्दनाथ मंदिर सेवा संस्थान गडहिंग्लजमार्फत करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment