गडहिंग्लज प्रतिनिधी : केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या २५ व्या वर्षावन दिनानिमित्त..आणि कुंभाराच काय झालं? या दोन अंकी नाटकास गडहिंग्जकरांनी उदंड प्रतिसाद देत नाटकाचा आस्वाद घेतला. गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमीच्या कलाकारांनी नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर करत गडहिंग्लजकरांची मने जिंकली.
नववर्ष आणि केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि कुंभाराचं काय झाल..? या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. गडहिंग्लजमधील जनता खुले नाट्यगृह येथे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घघाटन केदारी रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर,उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर,प्राचार्या शिवानी गवंडे, गडहिंग्लज प्रेस क्लबचे पत्रकार जगदीश पाटील,नाटकाचे लेखक जगदीश पाटील,नाट्य दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पुजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.शिवाजी पाटील म्हणाले की कला अकादमीच्या माध्यमातून बाल कलाकार,स्थानिक कलाकारांना विविध ठिकाणी कला क्षेत्रात संधी दिली जात आहे. वर्धापन दिनानिमत्त नाट्य प्रयोगाचे आयोजन करून आयोजकांनी कला अकादमीच्या कलाकारांना पाठबळ दिले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या की केदारी रडेकर फौडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष जानेवारी नववर्षाला गडहिंग्लजच्या नागरिकांना सांकृतिक मेजवानी दिली जात होती. कला अकादमीच्या या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून ही परंपरा पुन्हा सुरु झाली आहे. केदारी रेडेकर महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय आरोग्य योजना राबवून सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत.
गडहिंग्लज कला अकादमीच्या २० कलाकारांनी आणि कुंभाराचं काय झालं?, हे दोन अंकी नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर करत उपस्थितांची मने जिंकेली. संगीत,नेपथ्य, प्रकाशयोजना,अभिनय सर्वच पातळीवर नाटक प्रभावी होते. या नाटकाचे दिग्दर्शन प्रा.शिवाजी पाटील यांनी केले होते. यावेळी केदारी रेडेकर संस्था समुहाचे पदाधिकारी प्राध्यापक वृंद,कर्मचारी,गडहिंग्लजचे नाट्य रसिक उपस्थित होते. सूत्रसंचलन राजश्री कोल्हे तर आभार मयक कुरुंदवाडकर यांनी मानले.