Home Uncategorized गडहिंग्लज युनायटेडच्या अध्यक्षपदी ‘सुरेश कोळकी’ तर उपाध्यक्षपदी ‘सतीश पाटील’

गडहिंग्लज युनायटेडच्या अध्यक्षपदी ‘सुरेश कोळकी’ तर उपाध्यक्षपदी ‘सतीश पाटील’

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश कोळकी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांचीनिवड झाली. युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या वार्षिक निवडी करण्यात आल्या. एम.आर.हायस्कुल सभागृहात हि बैठक झाली.

                                                                                                                                                                                                                                                           यावेळी ललितशिंदे यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्यागतवर्षातील कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षपदासाठी श्री. कोळकी यांचे नाव संचालक संभाजी शिवारे यांनी सुचविले. संचालक मनिष कोले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्री.पाटील यांना भैरू सलवादे हे सुचक तर प्रशांत दड्डीकर यांनी अनुमोदन दिले. नव्या फुटबॉलहंगामातील विविध चौदा गटांच्या स्पर्धा, प्रशिक्षण शिबिर यांच्या नियोजनाची माहिती श्री.कोले यांनी दिली. यावेळी यंदाच्या हंगामाच्या तयारीसाठी खेळाडूंची वेगळी बैठक घेण्यात आली.

नवोदित खेळाडूंच्या विकासासाठी ग्रासरूट प्रमुख म्हणून राष्ट्रीय खेळाडू विक्रम पाटील तर युवा विभागाचे प्रमुख सौरभ पाटील यांची सलग दुसऱ्यावर्षी फेरनिवड झाली. इंजिनियर भुपेंद्र कोळी यांची डेव्हलमेंन्ट समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यातआली. या वर्षी आक्टोंबर महिन्यात दिवाळी सुट्टीत विसावी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्याचेही निश्चित झाले. नव्या हंगामात तेरा,पंधरा वर्षाखालील शालेय आणि अकादमी स्पर्धा,बेबी लीग,उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, डेव्हलपमेंन्ट लीग हे उपक्रम कायम ठेवण्याचे ठरले.

निवडीनंतर श्री.कोळकी,श्री.पाटील यांनी कृतज्ञताव्यक्त केली. विजय पाटील,ओमकार जाधव,यासीन नदाफ,सौरभ जाधव,संतोष निळकंठ, रोहित साळुखें यावेळी उपस्थित होते. श्री.शिवारे यांनी आभार मानले.

Related Posts

Leave a Comment