गडहिंग्लज प्रतिनिधी : भगवान महावीर स्वामी यांचा 2624 वा जन्मोत्सव गडहिंग्लज येथील “जैन श्वेतांबर मूर्ती पुजक संघ’ यांच्यावतीने पिराजी पेठेतील मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला .
यावेळी श्रावक, श्राविका,भाविक,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान महावीर यांच्या मातोश्री त्रिषलामाता यांना पडलेल्या 14 स्वप्नांसह सजवलेल्या पाळण्यामध्ये भगवान महावीरांना प्रतिकात्मक रूपामध्ये श्रीफळ ठेवून पाळणागीत गाऊन भक्ती भावाने,भक्ती गीते गाऊन व स्त्रोत पठण करत श्री महावीर स्वामी जन्मकाळ उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला.
यावेळी भगवानांची आरती,मंगळ दिवा करून उत्सवाची सांगता करण्यात आली.
‘जगा आणि जगू द्या’ या मूलतत्त्वावरती मार्गक्रमण करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी गडहिंग्लज जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुनील दोशी,उपाध्यक्ष प्रकाश शहा,ट्रस्टीगन सचिन मेहता,सौरभ मणियार,अश्विन दोशी,जितेंद्र शहा, अजय शहा यांच्यासह श्रावक,श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते,