गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील घाळी कॉलेज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष नियोक्ता प्रतिनिधीपदी योगेश शहा यांची नियुक्ती झाली असून सदरच्या नियुक्तीचे पत्र कॉलेजचे प्राचार्य दत्ता पाटील यांनी दिले.
कोल्हापूर जिल्हातील शैक्षणिक गुणवत्ते संदर्भात अव्वल म्हणून डॉ.घाळी कॉलेजला ओळखले जाते. पदवी व पदव्युत्तर पातळीवर अभ्यासक्रम व अभ्यासक्रमपूरक विविध उपक्रम राबविणारे महाविद्यालय म्हणून शिवाजी विद्यापीठात महाविद्यालयाचा नावलौकिक आहे.
भविष्यकाळात नव्या काळानुरूप निर्माण होणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील गरजानुसार महाविद्यालयात गुणवत्ता संवर्धन आणि वृध्दी होण्यासंदर्भात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष कार्यरत आहे. सदर कक्षात नियोक्ता प्रतिनिधी (Employer Representative) म्हणून योगेश शहा यांचे मार्गदर्शन आणि योगदान महाविद्यालयाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे डॉ. घाळी कॉलेज मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पुढील पाच वर्षासाठी नियोक्ता प्रतिनिधीपदी योगेश शहा यांची निवड करण्यात आली आहे.