Home Uncategorized हॉरिझन,साधनाची हायस्कुलची विजयी सलामी;डॉ.घाळी फुटबॉल लीग : जागृती,गडहिंग्लज,जागृती, क्रिएटिव्हचे चमकदार विजय

हॉरिझन,साधनाची हायस्कुलची विजयी सलामी;डॉ.घाळी फुटबॉल लीग : जागृती,गडहिंग्लज,जागृती, क्रिएटिव्हचे चमकदार विजय

by strnk

गडहिंग्लज प्रतिनिधी : डॉ.घाळी शालेय फुटबॉल लीग स्पर्धेत आज सतरा वर्षे गटात न्यू होरायझन स्कुल, साधना हायस्कूल यांनी प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. जागृती हायस्कूल,गडहिंग्लज हायस्कुल,क्रिएटिव्ह स्कुलने रंगतदार सामन्यात चमकदार विजय नोंदविले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत. लीगचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.

दुपारी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. समन्वयक सक्षम तोंदले यांनी स्वागत केले. युनायटेडचे संचालक मनिष कोले यांनी प्रास्ताविक केले. युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, अँड.बी.जी.भोसकी,गजेंद्र बंदी,महेश घाळी,सुशांत घाळी,प्रशांत दड्डीकर,सचिन मगदूम उपस्थित होते. अवधुत चव्हाण यांनी आभार मानले. पहिल्या सामन्यात हॉरिझन स्कुलने नवख्या वि.दि.शिंदे स्कुलचा ५-० असा मोठा पराभव केला. वल्लभ मोहितेने दोन तर साई बणगे,वर्धन कांबळे,स्वरुप दड्डी यांनी प्रत्येकी एक गोल करून विजय साकारला.
चुरशीच्या सामन्यात साधना हायस्कुलने रिहान अत्तारच्या निर्णायक गोलच्या जोरावर एम.आर. हायस्कुलला नमवून आगेकूच केली.

जागृती हायस्कूलने केदारी रेडेकर पब्लीक स्कुलवर ३-० अशी मात केली. जागृतीच्या अमन मुल्लाने दोन, वैभव सुतारने एक गोल करून मोलाची कामगिरी केली. क्रिएटिव्ह स्कुलने विश्वजीत बिलावरच्या महत्वपूर्ण गोलमुळे वि.दि.शिंदे स्कुलला १-० असे हरवून पहिला विजय नोंदविला. गडहिंग्लज हायस्कुलने विनायक गोंधळीच्या मैदानी गोलमुळे एम.आर. हायस्कूलचा पराजय केला. सागर पोवार,सुरज हनिमनाळे,प्रसाद पोवार,आर्यन दळवी,अमर गवळी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Related Posts

Leave a Comment