गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘१४ सप्टेंबर’ हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना आपली राष्ट्रभाषा हिंदी याची समज यावी यासाठी शाळेमध्ये हिंदी दिनानिमित्त हिंदी कहानियाँ (स्टोरी टेलिंग) सांगण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धकांना मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तर यावेळी समन्वयक श्रीमती विमल वांद्रे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे. हिंदी भाषेविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे या पद्धतीने विद्यार्थ्यांना हिंदी दिवस याचे महत्त्व पटवून दिले. अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या सर्व शिक्षिका यांनी नीटनेटके नियोजनामुळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचा शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होता.