गडहिंग्लज प्रतिनिधी : भादवण(ता-आजरा) येथील सत्यम कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचा तेराव्या वर्षाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून यानिमित्त ‘शिवकालीन प्राचिन मंदिराची प्रतिकृती’ साकारण्यात आली आहे. मंडळाच्या या शिवकालीन प्राचिन मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच माधुरी रणजित गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशीलकर,सेवा सोसायटी माजी चेअरमन मारुती ईश्वर देसाई,श्रमिक महिला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू मुळिक,शांताराम माने व केदारलिंग दूध संस्था चेअरमन रघुनाथ पोवार यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उमेश आपटे व वैशाली आपटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रणजित गाडे यांनी मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा सांगितला. तर उमेश आपटे यांनी भादवणच्या प्रत्येक नागरिकांच्या तसेच मंडळाच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. लोकनियुक्त सरपंच यांनी आनंदी राहा आयुष्यात आनंद विकत घेता येत नाही त्यासाठी मनाने खंबिर होणे गरजेचे असते असे मार्गदर्शनपर भाषण केले.
यावेळी भादवण गावामध्ये विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या तसेच विविध पदावर निवड झालेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त भादवण मधील गायन प्रेमींनी बसवलेला गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सुभाष सुतार,दत्तात्रय शिवगंड,शांताराम माने,सचिन देसाई,बाळासाहेब नेसरीकर,पुनम आजगेकर,प्रदीप मुळीक,अशोक दाभोळे,सागर गोरे यांनी बहारदार गाणी सादर केली. त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास केदारलिंग दूध संस्थेच्या व्हा.चेअरमन सुधा जयसिंग गोडसे,संचालक बाबुराव दाभोळे, बाळासाहेब सुतार,सुरेश कांबळे, आक्काताई पाटील,सेवा सोसायटी माजी व्हा.चेअरमन दशरथ डोंगरे, संचालिका रत्नाबाई केसरकर,ऑल इंडिया कबड्डी पंच प्रकाश मुळीक, विजय माने,शंकर कांबळे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य,पदाधिकारी,महिला,युवक-युवती व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.