Home Uncategorized अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ परप्रांतीय नराधमाला कठोर शिक्षा करा : आम्ही गडहिंग्लजकरांची मागणी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ परप्रांतीय नराधमाला कठोर शिक्षा करा : आम्ही गडहिंग्लजकरांची मागणी

by strnk

गडहिंग्लज प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ परप्रांतीय नराधमाला कठोर शिक्षा करा अशी मागणी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन देऊन आम्ही गडहिंग्लजकरांनी केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे कि गडहिंग्लज येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर परप्रांतीय युवकाकडून अत्याचार झाला आहे. त्या नराधमाला गडहिंग्लज पोलीसांनी अटक केली असून लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी अशी समस्त गडहिंग्लजकरांची मागणी आहे. गडहिंग्लजच्या वकील संघटनेस देखील आमची विनंती आहे. या नराधम परप्रांतीयाचे कोणीही वकीलपत्र घेवू नये. तर संशयित आरोपीस शिक्षा व पिडीत मुलीला व कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यापद्धतीने तपास करावा. अशी विनंती निवेदनातून आम्ही गडहिंग्लजकर यांनी केली आहे.

यावेळी वैभव पाटील,सुमित चौगुले,स्वप्नील आजरी,रोहित जाधव,सार्थक देसाई,सूरज अस्वले,सौरभ खोत,नामदेव पोवार,प्रतीक रोटे उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment