गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील संस्कार कॉलेजमध्ये ज्ञानेश्वर मनोहर सावंत या विध्यार्थ्यांने शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून सर्वसामान्य कुटुंबातून असणाऱ्या ज्ञानेश्वर सावंत याचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
येथील संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजचे अनेक विद्यार्थी देश विदेशात नोकरी करतात. गेल्या १३ वर्षात संस्थेचे अनेक विद्यार्थी जहाजावर तसेच मोठमोठ्या हॉटेल्समध्ये नोकरीसाठी परदेशात आहेत. नोकरीबरोबरच पुढील शिक्षणाची गरज ओळखून चंदगड तालुक्यातील कुरणे गावचा विद्यार्थी ज्ञानेश्वर मनोहर सावंत या विद्यार्थ्यांने आपले पुढील पदवी शिक्षण लंडन येथे पूर्ण केले. शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर यांनी २०१६-२०१७ साली संस्कार कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर पुणे येथे ट्रेनिंग करून नाशिक येथे ‘क्यूटी’ ग्रुपमध्ये नोकरी केली. पुढे त्याला कॉलेजच्या मार्गदर्शनाने ऑस्ट्रेलिया येथे नोकरी मिळाली. नोकरीमध्ये मासिक तीन लाखापर्यंत पगार असताना ज्ञानेश्वरने पुढील पदवीचे शिक्षण घेणे आवश्यक समजून बिजनेस हॉटेल् मॅनेजमेंटची डिग्री लंडन येथील लंडन स्कूल ऑफ बिझनेस अॅ डमिनिस्ट्रेशन कॉलेजमधून पूर्ण केले.
संस्थेचे अध्यक्ष सुनील कुराडे,उपाध्यक्ष नंदकुमार गोरुले,रामचंद्र शिवणगेेकर,पुंडलिक भालबर,कानोबा माळवे,इंद्रजीत बनसोडे,संदीप देसाई,शिवानंद गड्डी,माधुरी गाडे,माया केसरकर,शोभा कडाकणे,संस्थेचे प्राचार्य रणजीत गाडे भाऊसाहेब पाटील,अमित धवल,मयूर केसरकर,अनिल नाडगोंडे,राजेंद्र डवरी,रूचिता पवार,सिद्धू खोत,ज्योती पवार व महादेव कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.