गडहिंग्लज प्रतिनिधी : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसास प्रतिटन ३१००/- प्रमाणे दर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रकाश पताडे यांनी दिली. कारखाना दिनांक १/१२/२०२४ रोजी सुरु झाला असून दि.२८/१२/२०२४ अखेर २८ दिवसात ६६,५८० मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. सरासरी १०.५५% सरासरी साखर उताऱ्याने ६४,०२० क्विटल साखरेच उत्पादन झाले आहे.
तसेच २१/१२/२०२४ रोजी डिस्टीलरी चालू झाली असून ९ दिवसात १,९८,७९० लिटर्स अल्कोहोल उत्पादन झाले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालू असून १/१२/२०२४ ते १५/१२/२०२४ या पंधरवडा अखेर गळीतास आलेल्या ऊसाची रु.३१००/- प्रति मे. टन प्रमाणे होणारी ऊस बिले व तोडणी / वाहतुक कंत्राटदार यांची बिले लवकरच अदा करीत आहोत. तरी सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादकांनी पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या गडहिंग्लज साखर कारखान्यास गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन प्रकाश पताडे यांनी केले आहे.