गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानली जाणारी धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी ‘सात’ थर लावून फोडली असून संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाला तीन लाखांचे बक्षीस खासदार धनंजय महाडिक व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.