Home Uncategorized …महिन्याभराच्या विश्रांतीनंतर गडहिंग्लजमध्ये पुन्हा घरफोडी..!

…महिन्याभराच्या विश्रांतीनंतर गडहिंग्लजमध्ये पुन्हा घरफोडी..!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : महिन्याभराच्या विश्रांतीनंतर गडहिंग्लजमध्ये पुन्हा घरफोडी झाली असून ८६ हजार रुपये रोखड अज्ञात चोरट्यांने लंपास केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अयोध्या नगर दुसरी गल्ली येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक लियाकत सय्यद(वय-५९) हे सोमवार(ता-११) रोजी आपल्या पत्नी सोबत सासुरवाडीला गेले होते. सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या काळात घराचे बंद दरवाजाच्या कडी-कोयंडा उचकटुन कुलूप तोडून घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या तिजोरीतील लॉकरमधील अज्ञात चोरट्याने ८६ हजारांची रोखड लंपास केली.सदरची घटना लियाकत यांच्या भावास लक्षात आलेनंतर त्यांनी लियाकत यांना सांगितली त्यानंतर लियाकत सय्यद यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.

Related Posts

Leave a Comment